26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषकोविडकाळात घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री

कोविडकाळात घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ठाकरेंवर थेट निशाणा

Google News Follow

Related

कोविड महामारीच्या काळात संपूर्ण देशातील राज्यांचे मुख्यमंत्री संकटाशी सामना करत होते, पण त्या संकटाला घाबरून घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत प्रखर टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. बुधवारी (१३ नोव्हेंबर) चाळीसगावमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असतात, ते खरे लोकप्रतिनिधी असतात, पण राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नव्हते. असा नेता महाराष्ट्राला कसा वाचविणार, असा सवाल करून, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे महायुती सरकारच महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास समर्थ आहे, अशी स्पष्ट ग्वाही मंत्री शाह यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, येत्या २३ तारखेला आघाडीचा सुपडा साफ होणार आहे, आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. हरियाणाच्या निवडणूक निकालाने काँग्रेस आघाडीचा फुगा फुटला आहे, झारखंडमध्येही भाजपाचे सरकार येणार आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा : 

अनिल देशमुखांना क्लीन चीट नाही; फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न

गौप्यस्फोटांना ऊत… मविआचे सरकार अदानींनी पाडले; पवारांच्या पाठिंब्याने?

इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी ३७० कलम परत येणार नाही!

‘बॅगेत कपडेच आहेत, युरीन पॉट नाही’

काँग्रेस केवळ जनतेची दिशाभूल करून राजकारण करत आहे. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात गुंतवणूक घटली असा अपप्रचार ते करतात, पण ते त्यांच्याच काळातील वास्तव होते. शिंदे-फडणवीस-अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर गेल्या दोन वर्षात विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला असल्याचे मंत्री शाह यांनी सांगितले.

काँग्रेसवर टीका करताना मंत्री शाह म्हणाले, सोनिया-मनमोहन सरकारच्या दहा वर्षांत पाकिस्तानातून दहशतवादी येत होते, बॉम्बहल्ले करून निघून जात होते, पण वोटबँकेच्या राजकारणापायी त्यांनी काहीच केले नाही. २०१४ मध्ये मोदी सरकारला जनतेने निवडून दिले, मोदीजींनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गेल्या दहा वर्षांत मोदींनी नक्षलवाद निपटून काढला आहे. येत्या काही वर्षांत या देशातून नक्षलवाद संपलेला असेल, अशी ग्वाही मंत्री शाह यांनी दिली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा