‘उद्धव ठाकरे घरात नाहीतर लोकांच्या दारात शोभून दिसतात’

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

‘उद्धव ठाकरे घरात नाहीतर लोकांच्या दारात शोभून दिसतात’

राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या मैदानात उभे राहिलेले उमेदवार एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, टीका, टिप्पणी करताना दिसत आहेत. तसेच आमचे सरकार आले तर अमुख करू तमुख करू अशी आश्वासने देत पक्षाकडून वचननामे प्रकाशित करण्यात येत आहेत. याच दरम्यान, शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा वचननामा प्रकाशित केला. उद्धव ठाकरेंनी पक्षाचा वचननामा निवासस्थान ‘मातोश्री’वरून केला. यावरून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.

हे ही वाचा : 

‘जम्मू-काश्मीर विधानसभेत हाणामारी, कलम ३७० चे बॅनर भाजपाने फाडले’

लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!

उबाठाचे नेते भास्कर जाधव काँग्रेसवर वैतागले

बाबा सिद्दीकीच्या निकटवर्तीयांना जीवे मारण्याची धमकी

ते पुढे म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

 

Exit mobile version