उद्धव ठाकरे स्वतः षंढ, बाळासाहेबांचा फोटो बाजूला सारल्यावर किंमत कळेल!

भाजप नेते निलेश राणेंची खरमरीत टीका

उद्धव ठाकरे स्वतः षंढ, बाळासाहेबांचा फोटो बाजूला सारल्यावर किंमत कळेल!

शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन काल मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही गटांकडून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वरळी येथील एनएससीआय डोम येथे तर उद्धव ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या फोटोचा वापर दोन्ही बाजूने करण्यात आला.

परंतु, षंढ नसाल तर बाळासाहेबांचा फोटो न लावता निवडणुकीत उतरण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केले. ठाकरेंच्या आवाहनाला भाजप नेते निलेश राणे यांनी उत्तर दिले. उद्धव ठाकरे हे स्वतः षंढ असून त्यांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो बाजूला सारावा म्हणजे समाजात त्यांची किंमत किती आहे ते त्यांना समजेल , अशी खरमरीत टीका निलेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा..

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी!

बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनीसंबंधित ३५ ठिकाणांवर छापेमारी

बिहार सरकारला न्यायालयाचा झटका !

‘अकबरनगर घेतय मोकळा श्वास, बेकायदेशीर मशिदी जमीनदोस्त’!

भाजप नेते निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे स्वतः षंढ आहेत, तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावू नका म्हणजे समाजात तुमची किती किंमत हे समजेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहेत. महापुरुषांचा फोटो लावणे हे काही चुकीचे आहे का?. ते पुढे म्हणाले, माझा बाप चोरला, माझं चिन्ह चोरलं अशी ठाकरेंची नेहमीचीच बडबड आहे. परंतु, येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा अशी बडबड केल्यास चालणार नाही. लोकसभेत मिळालेला विजय मी मानत नाही, कारण मुस्लिम लोकांची मते त्यांना मिळाली आहेत, हिंदूंच्या मतांचा त्यामध्ये काहीच संबंध नाही, असे निलेश राणे म्हणाले.

Exit mobile version