उद्धव ठाकरेंना दोन वर्षांपूर्वीच जनतेने गेट आउट केलंय !

मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंना दोन वर्षांपूर्वीच जनतेने गेट आउट केलंय !

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या चे झालेले नुकसान हे दुर्दैवी नक्कीच आहे. परंतु यावरून महाविकास आघाडीकडून राजकारण केल जात आहे. महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनाला अत्यंत दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील सरकारला गेट आउट ऑफ इंडिया करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने दोन वर्षांपूर्वीच गेट आउट केले असल्याचे मुख्यमंत्री शिंदेनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यानी माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. या घटनेवरून विरोधकांकडून राजकारण करण्यात येत असून हे अत्यंत दुर्दैवी आहे. आज राज्य सरकार विरोधात विरोधक ‘जोडे मारो’ आंदोलन करत आहे, मात्र मागच्या वर्षी कर्नाटकामध्ये अनधिकृत बांधकामांचा उल्लेख करत दोन जेसीबी लावून रातोरात कॉंग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला, यावर खरेतर यांना जोडे मारले पाहिजेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : 

महाराजांनी सुरत लुटलीच नाही, पण कॉंग्रेसने तसं शिकवलं !

गाझामधील बोगद्यात सहा ओलिसांचे मृतदेह सापडले

गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला करणारा अटकेत

बांगलादेश: हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहेत राजीनामे !

ते पुढे म्हणाले, लोकसभेच्या पूर्वी मविआ दंगलीची भाषा करत होती. यांना महाराष्ट्र अशांत हवा आहे, मात्र महाराष्ट्रातील जनता आत सुज्ञ झाली आहे. महाराष्ट्रात शिवद्रोही सरकार आहे, त्यांना गेट आउट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाकरेंना दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्राच्या जनतेने गेट आउट केल आहे, जनतेने त्यांची जागा देखील दाखवून दिली आहे. एकीकडे शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि काम अफझल-औरंगजेबी करायचं, हे आतापर्यंत त्यांनी केल आहे. महाराजांचे नाव घेवून निवडून यायचं आणि अफझल-औरंगजेबी कारभार करायचा, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

Exit mobile version