26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेष...आणि उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले!

…आणि उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले!

Google News Follow

Related

बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेप्रसंगी उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापल्याचे व्हीडिओतून स्पष्ट झाले.

या सभेसाठी बीकेसीवर उद्धव ठाकरे ७.२५ मिनिटांनी दाखल झाले. व्हीआयपी गेटमधून ते आत शिरल्यावर त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, सुरक्षा रक्षकांना मात्र पोलिसांनी आत सोडले नाही. त्यामुळे वाद निर्माण झाला. ते अडविण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा राग अनावर झाला. तेव्हा त्यापैकी कुणीतरी अधिकारी मी बघतो, असे म्हणाल्यावर बघतो काय बघतो असे उद्धव ठाकरे रागावून विचारताना दिसले. नंतर या सगळ्यांची नावे लिहून घ्या, असेही ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाल्याचे दिसतात. त्यानंतर सोडा सगळ्यांना असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

लाडकी बहीण योजनेवर टीका करणारी मविआ महिलांना देणार ३ हजार

पवारांची यादी अकबरला मिळाली, अमरच्या यादीचे काय?

‘पीएम विद्यालक्ष्मी’च्या मदतीने विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला

या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून चर्चा रंगल्या आहेत. उद्धव ठाकरेंना मीडियाने शांत, संयमी अश उपमा दिली आहे, पण प्रथमच उद्धव ठाकरे हे संतापल्याात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा