उद्धव ठाकरे मुस्लिम मतांच्या भरवशावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. धर्माच्या आधारावर मते घेण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव असून महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांमधून झोडपल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आपल्या पक्षाच्या बैठकीत, एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत लिहिले की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आता ते ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे. उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मते घेण्याचा त्यांचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांमधून झोडपल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी स्वतःची मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली. त्यांच्या विभाजनकारी भाषेवर आमचा आक्षेप आहेच. भाजपा त्यांच्या विखारी भाषेला जशास तसं प्रत्युत्तर देईल, असे बावनकुळे म्हणाले.
हे ही वाचा:
अभेद्य बचावात्मक खेळीसाठी ओळखले जाणारे क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन
ढगफुटीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित; २०० यात्रेकरू अडकले
हिमाचलमध्ये ढगफुटी; पुराच्या पाण्यात ३६ जण गेले वाहून
वायनाड भूस्खलनात २५६ जणांचा मृत्यू; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आता ते ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे.
उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 1, 2024