‘४० आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरे अजून ट्रॉमात’

विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंचा हल्ला

‘४० आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरे अजून ट्रॉमात’

बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उत्तर देत हल्ला चढवला आहे. ४० आमदारसोडून गेल्याने उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे, त्या ट्रॉमातुन ते बाहेर आले नसल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंना जो अनुभव आला. कारण अस कोणाला वाटल न्हवत की १०-१२ च्या वर आमदार फुटतील. दोन-तीन आमदार फुटले होते. मात्र, ४० आमदार जातील असे त्यांना वाटले न्हवते. त्यांचा आमदारांशी संवादही राहिला न्हवता. मोठ्या प्रमाणात आमदार सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना जो धक्का बसला त्या ट्रॉमातून ते बाहेर आलेले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक विषयात ते तेवढेच मांडतात, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

हे ही वाचा :

कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे स्वीकारले अध्यक्षपदासाठीचे नामांकन

रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूर बंद !

अरविंद केजरीवालचं दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार

ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राची डायमंड लीगच्या अंतिम फेरीत धडक

त्या पुढे म्हणाल्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुर्ल्यामध्ये अशी घटना घडली. त्यावेळी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले न्हवते. मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी यामध्ये माझे काही मत नाही. मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे स्वतः कोठेवाडीला  भेट द्यायला आले होते. त्यावेळेचे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरचे उद्धव ठाकरे यांच्या भूमिका वेगळ्या असल्याचे समोर दिसत आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. या प्रकरणामध्ये ठाकरेंनी राजकीय मतभेत न आणता, मुख्यमंत्री शिंदे पिडीत कुटुंबियाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, पंरतु वेगवेगळे विषय उपस्थित करून हा विषय दुसरीकडे भरकटू नये यासाठी सर्व पक्षांनी या विषयावर एकमताने काम करावे, अशी विनंती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.

Exit mobile version