शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये हिटलरने ज्यूंच्या विरोधात केलेल्या हत्याकांडाचे समर्थन केले आहे.’आर्टिकल १९ इंडिया’ ची बातमी पुन्हा पोस्ट करत संजय राऊतांनी दावा केला की, इस्रायली सशस्त्र दलांनी या बाळांच्या इनक्यूबेटरची वीज खंडित केली आहे. हिटलरने ज्यूंना का मारले? हे आता समजत आहे?, असे संजय राऊतांनी ट्विट केले आहे.या पोस्टवर संताप व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी ही पोस्ट डिलीट केली.
‘आर्टिकल १९ इंडिया’ द्वारे एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांचा व्हिडिओ शेअर केला होता.या पोस्टमध्ये इस्रायली सशस्त्र दलांनी या बाळांच्या इनक्यूबेटरची वीज खंडित केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांनतर खासदार संजय राऊत यांनी १४ नोव्हेंबर रोजी ‘आर्टिकल १९ इंडिया’ ही पोस्ट रिपोस्ट करत दावा केला की, “हिटलर ज्यू समुदायाचा इतका द्वेष का करत होता? हे आता समजत आहे?”
हे ही वाचा:
ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!
पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस
५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
याआधी, ‘आर्टिकल १९ इंडियाने’ आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “अल-शिफा हॉस्पिटलमध्ये वेळेपूर्वी जमलेले बाळ ओरडत आहेत. बाळांना ज्या इनक्यूबेटरमध्ये ठेवले होते त्याची वीज इस्रायलने तोडली आहे. सशस्त्र दलांनी रुग्णालयाला चारही बाजूंनी घेरले आहे. दवाखान्यात कोणतेही खाद्यपदार्थ, दूध किंवा पाणी आणण्यास परवानगी नाही.” पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील आहे ज्यात दावा केला आहे की, तो अल शिफा हॉस्पिटलचा आहे.मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या बाळांचा मृत्यू झालेला नाही.
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये असे सुचवून दिले की, होलोकॉस्टमध्ये हिटलरकडून मारण्यात आलेल्या ज्यूलोकांनी देखील अशीच कृत्ये केली होती म्हणून त्यांना मारण्यात आले होते.संजय राऊत यांच्या पोस्टवर संताप व्यक्त केल्यानंतर त्यांनी ते डिलीट केले.