सध्या राजकीय नेत्यांवर संक्रांत येण्याचे प्रकार काही दिवसांपासून घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची बोट समुद्रात भरकटण्याची घटना घडली . सामंत रायगडमधील मांडवा येथून स्पीड बोट मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडे येत असताना भर समुद्रात हा प्रकार घडला घडला. पण सामंत यांच्या स्वीय सहायकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ते यातून सुखरूप बचावले.
उद्योगमंत्री सामंत शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी अलिबागला गेले होते. संध्याकाळी कार्यक्रम आटोपून ते सागरी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघाले. परंतु प्रवास करत असतांना भर समुद्रात त्यांची स्पीडबोट अचानक बंद पडली. त्यानंतर बोटीतील सर्व यंत्रणाही ठप्प झाली. त्यामुळे स्पीडबोटच्या कॅप्टनला इमर्जन्सी संदेश पाठवता येत नव्हता. अशातच लाटांमुळे सामंत यांची स्पीडबोट भरकटू लागली. बोटीवरील नियंत्रण सुटत होते. मोबाईलला रेंज मिळत नसतानाही सामंत यांनी शर्थीचे प्रयत्न करून दुसरी बोट मागवण्यात यश आले. अखेर या दुसऱ्या बोटीत सामंत आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी चढले आणि सुरूप बचावले. बुडत असलेल्या बोटीलाही वाचवण्यात यश आले. हिंदुस्थान संचारने याबाबचे वृत्त दिले आहे.
हे ही वाचा:
आम्ही विश्वास ठेवण्यायोग्य शेजारी आहोत; श्रीलंकेला भारताने केले आश्वस्त
‘घटनाबाह्य’ कार्यक्रमांची आमंत्रणं हवीत कशाला?
ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा व्ही.पी.सिंह केला…
अंधारेबाईंचा ‘अगरबत्ती’वाल्यांवर प्रहार
दरम्यान शुक्रवारी माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या कारला पालघर यथे जात असताना मुंबई-घोडबंदर महामार्गावर डंपर वाहनाने धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचाअपघात झाला होता. वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. १५ दिवसांच्या उपचारांनंतर धनंजय मुंडे यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला.