30 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषसावरकर नावाची लस खूप लहानपणी टोचली गेली, म्हणून जिवंत आहोत!

सावरकर नावाची लस खूप लहानपणी टोचली गेली, म्हणून जिवंत आहोत!

सावरकरांवरील पुस्तकाचा अनुवाद करणारे लेखक, विचारवंत उदय निरगुडकर यांचे स्पष्ट मत

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकर नावाची लस खूप लहानपणी मला माझ्यासारख्या असंख्य तरुणांना टोचली गेली. म्हणून आम्ही वैचारिकदृष्ट्या जिंवत आहोत, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महात्म्य लेखक, विचारवंत उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले. औचित्य होते ते निरगुडकर यांनी वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष या त्यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक आणि केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, सावरकरांचे नातू रणजित सावरकर, मुंबई प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार, भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.

निरगुडकर म्हणाले की, सावरकरांबद्दल माफीवीर, भर्तीवीर असे शब्द वापरले जातात. सैनिकांची भर्ती वाढवा, लेखण्या मोडा शस्त्र हाती घ्या असे सावरकरांनी साहित्य संमेलनात सांगितले होते. तेव्हा त्याचे वर्णन करताना भर्ती वीर असा उल्लेख केला जाऊ लागला. आज जेव्हा कलम ३७० रद्द होते, ३५ अ रद्द होतं, ट्रिपल तलाकविरोधात ठाम निर्णय होतो. घराघरात शौचालयं उपलब्ध होतात, घरं मिळतात, वीज पाणी पोहोचवलं जातं. जयशंकर म्हणतात मी तुमच्यासोबत नाही मी रशियाच्या बाजूने नाही. कुंपणावर बसणार नाही, मी माझ्या जमिनीवर पाय रोवून उभा राहणार तेव्हा जाणवतं माणूस किती जगला ही मृत्युची तारीख ठरवत नाही. तर त्याचा विचार त्याच्या अनुयायांनी किती काळ जागवत ठेवला यावर ठरत असतं. त्या अर्थाने सावरकर आजही जिवंत आहेत. म्हणूनच हे पुस्तक माझ्यासाठी एक अनुवादाची असाइनमेंट नव्हतं.

हे ही वाचा:

गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये उष्माघातामुळे १७,०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे गमावला जीव

अर्शदीपने उद्ध्वस्त केले, २० लाखांचे स्टम्प

अक्षय्य तृतियेला ४ चाकी गाड्यांची खरेदी ४४ टक्क्यांनी वधारली!

निरगुडकरांनी सावरकरांशी आपले कसे नाते होते याविषयी सांगितले की, सावरकर आणि माझे आजोबा यांचा फोटो माझ्या घरी होता तो काळाच्या ओघात खराब झाला पण तरीही हा माझ्यासाठी कुलाचार आहे. दरवर्षी कुलदेवतेचे दर्शन घेतो, नवस फेडतो. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी प्रयत्न केले याचे कारण सावरकर नावाची लस खूप लहानपणी मला माझ्यासारख्या असंख्य तरुणांना टोचली गेली. म्हणून आम्ही वैचारिकदृष्ट्या जिंवत आहोत. हयातीत अनेकांची कामे मोठी वाटतात, ती माणसे मोठी वाटतात, त्यांच्या घोडचुका दिसायला लागतात, त्यांच्या चुका निस्तरता निस्तरता नाकी नऊ येतात. पण स्वतःच्या हयातीत माफीवीर, भर्तीवीर खलनायक ठरवले गेलेले लोक हे मृत्युनंतर ते किती महानयक असतात, हे कळते. म्हणूनच राष्ट्रपित्याचे दिवस अनुभवणाऱ्या देशाला राष्ट्रनायकाचे दिवस अनुभवायचे भाग्य मिळत आहे, याला फार महत्त्व आहे.

निरगुडकर यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले हे सत्य आहे त्याच दिवशी तुकडे झाले त्याआधी १०० वर्षांपूर्वी सातवेळा तुकडे झाले देशाचे. अखंड भारत एकत्र येईल तेव्हा लिहिलेले सावरकर खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आले असे म्हणावे लागेल. या पुस्तकासाठी अनेकांचे सहाय्य लाभले. बशीर जमादार त्यांनी मदत केली. तात्कालिन कारण व्हावे लागते. एकदिवशी चाणक्य फेम मनोज जोशी मला म्हणाले की, माहुरकरांकडे बसलोय त्यांचे इंग्रजीत पुस्तक लिहिले आहे. तू भाषांतर केले पाहिजेस. माहुरकरही म्हणाले, तुम्ही पुस्तक करा. देवेंद्रजींच्या हस्ते त्याचे प्रकाशन होईल असे वाटते. ते पुस्तक वाचले आणि त्या पुस्तकामुळे थरारून गेलो. आज तेच लेखणीतून उतरलेले आहे. हे पुस्तक विकत घ्या तुमच्या हाताची थरथर थांबेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा