उदयपूर चाकू हल्ला प्रकरण; देवराजचा मृत्यू, शाळा-कॉलेज बंद !

परिसरात तणावपूर्ण परिस्थिती

उदयपूर चाकू हल्ला प्रकरण; देवराजचा मृत्यू, शाळा-कॉलेज बंद !

उदयपूरमध्ये चार दिवसांपूर्वी चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर येथील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. सध्या शहरात शांतता राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद असून शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. शहरात पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, हे लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण उदयपूरला छावणीचे स्वरूप आले आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी अनेक मागण्यांसह निदर्शने केली, त्यानंतर प्रशासनाने त्यांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.

उदयपूरमध्ये शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सूरजपोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भट्टियानी चौहट्टा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. यातील आरोपी हा अल्पवयीन असून तो मुस्लिम समुदायाचा आहे. आरोपी विद्यार्थ्याने वर्गातील देवराज यावर चाकूने हल्ला केला होता. जखमी विद्यार्थ्याला तातडीने महाराजा भोपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर शहरातील लोक मधुबन परिसरात जमा होऊन आंदोलन केले होते. यावेळी मुस्लिम समाजाने दगडफेक करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक करून बालसुधारगृहात पाठवले आणि त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली.

या हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी देवराजचा अखेर काल मृत्यू झाला. परिसरात पुन्हा हिंसाचार घडू यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत विद्यार्थ्यावर मंगळवारी (२० ऑगस्ट) सकाळी ७ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यासोबतच मंगळवारी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. मात्र, मंगळवारी होणाऱ्या परीक्षा कायम राहणार आहेत. प्रशासनाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा :

कासीम पठाणच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या

पोर्शे कार अपघात; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोघांना अटक

कोलकाता पीडितेचा मृतदेह पालकांकडे देण्यास वेळ का लागला?

“बदलापूर अत्याचार प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही”

 

Exit mobile version