‘सरदार पटेल, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद हेदेखील देशात यूसीसी लागू करण्यास इच्छुक होते. मात्र अल्पसंख्याकांच्या प्रेमापोटी त्यांनी तसे केले नाही,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. गेल्या सात दशकांहून अधिक काळात स्थापन झालेली सरकारे अल्पसंख्याकांची मते मागण्यासाठी लढत होती. त्यामुळे ते यूसीसी लागू करू शकले नाहीत. मात्र भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तराखंड हे यूसीसी लागू करणारे पहिले राज्य ठरल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
अमित शहा यांनी यावेळी यूपीए सरकारवर जोरदार हल्ला केला. ‘आपण सर्वांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सरकार पाहिले आहे. गेल्या १० वर्षांत दररोज भारतात पाकिस्तानमधून कोणी ना कोणी येथे प्रवेश करत असे. पाकिस्तानमधून येऊन येथे दहशतवाद पसरवला जात असे. याची कोणी जबाबदारीही घेत नसे. त्यानंतर नागरिकांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडले.
हे ही वाचा:
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
कॉंग्रेसच्या अल्पसख्यांक विभागाला सर्वाधिक देणगी
७० वर्षांपूर्वीची अपुरी स्वप्ने मोदी पूर्ण करणार!
हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत
पाकिस्तानने पुन्हा भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र पंतप्रधानांनी यावेळी पुंछ आणि पुलवामा हल्ल्याचे सडेतोड उत्तर दिले. भारताने १० दिवसांत सर्जिकल स्ट्राइक आणि हवाई हल्ला करून सडेतोड उत्तर दिले. याआधी केवळ दोनच देश होते, जे सडेतोड प्रत्युत्तर देत असत. आता सडेतोड प्रत्युत्तर देणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे,’ असे शहा म्हणाले.