जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतरची गोड फळे मिळण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीचा वेग वाढू लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच एक भव्य मॉल उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा भारतातातील सर्वात मोठा मॉल असेल. दुबईमध्ये जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारत उभारणारी एम्मार कंपनीच हा मॉल उभारणार आहे. या मॉलचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आता पर्यटनबरोबरच खरेदीचा मनमुराद अनुभव घेता येणार आहे.
जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम दूर केल्यानंतर विदेशी गुंतवणुकीचे वारे वाहून लागले आहेत कलम ३७० रद्द केल्यानंतर अनेक परदेशी उद्योगपतींनी या केंद्रशासित प्रदेशाला भेट दिली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे श्रीनगरमध्ये शॉपिंग मॉल बांधण्यात येणार आहे. श्रीनगरमध्ये शॉपिंग मॉलशिवाय दोन आयटी टॉवरही बांधले जाणार आहेत.
जम्मू-काश्मीर औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. श्रीनगरमध्ये आयटी टॉवर बांधण्यासाठी एकूण १५० कोटी रुपये खर्च परदेशी गुंतवणूकदारांबाबत काश्मीरमधील सेम्पोरा येथे टॉवर उभारण्यासाठी जमीन देण्यात आली आहे. पुढील महिन्यापर्यंत टॉवरची पायाभरणी केली जाणार आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
बागेश्वर बाबांच्या दरबारात मारला होता ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ल्ला , ६ जण ताब्यात
ठाकरे गटातील कोणत्या नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स
पन्हाळगडावर चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात
‘त्या’ विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी
असा असेल शॉपिंग मॉल
देशातील या सर्वात मोठ्या मॉलमध्ये ५०० दुकाने असतील.पश्चिम आशियामध्ये अनेक सुपरमार्केट चालवणारा लुलू ग्रुप या शॉपिंग मॉलमध्ये हायपरमार्केट उघडणार आहे. मेगा मॉल १० लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधला जाणार आहे. या मॉलसाठी ही ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आयटी टॉवरसाठी १५० कोटी रुपये खर्च येणार आहे.