भारताच्या चिराग चिक्काराची सुवर्णझेप, ठरला दुसरा कुस्तीपटू!

किर्गिस्तानच्या अब्दिमालिक काराचोव्हचा केला पराभव

भारताच्या चिराग चिक्काराची सुवर्णझेप, ठरला दुसरा कुस्तीपटू!

भारताचा कुस्तीपटू चिराग चिक्काराने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. चिराग चिक्काराने U२३ जागतिक  कुस्ती चँपियनशिपमध्ये पुरुषांच्या ५७  किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अल्बानियातील तेराना येथे रविवारी (२७ ऑक्टोबर) ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिराग चिक्काराने किर्गिस्तानच्या अब्दिमालिक काराचोव्ह याचा ४-३ असा पराभव केला आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर कोरले. त्यामुळे चिराग हा U२३ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी २०२२ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अमन सेहरावतने U२३ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर अशी कामगिरी चिराग चिक्काराने केली. भारताच्या रितिका हुड्डा हिने देखील २०२३ मध्ये ७६ किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. U२३ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी रितिका हुड्डा ही पहिली भारतीय महिला ठरली होती. तसेच रवी कुमार दहियाने २०१८ मध्ये U२३ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक जिंकले होते.

हे ही वाचा :

संजय राऊत, नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणतात, यादीत काँग्रेसची टायपिंग मिस्टेक

रशिया- युक्रेनमधील युद्धावर नरेंद्र मोदी तोडगा काढू शकतील

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर गोळीबार

…म्हणे फडणवीस हे दुश्मन नव्हे विरोधक!

दरम्यान, १८ वर्षीय चिक्काराने प्री-क्वार्टर फायनलमध्ये गौकोटो ओझावाचा ६-१ असा पराभव केला होता. चिरागने उपांत्यफेरीत अझरबैजानच्या इयुनस इवबतिरोव्हचा १२-२ असा गुणांसह पराभव केला आणि उपांत्य फेरीत ॲलन ओरलबेकचा ८-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

Exit mobile version