भारताच्या पराभवानंतर दोन तरुणांची आत्महत्या

भारताच्या पराभवानंतर दोन तरुणांची आत्महत्या

A fabric low poly suicide rope with slipknot placed on the white concrete wall with white space on left. 3D illustration and rendered by program Blender.

विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्यानंतर टीव्ही फोडण्याच्या घटना घडतात. मात्र ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दोन तरुणांनी भारताचा पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केल्याचे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प. बंगालमधील बांकुरा येथे राहणारा राहुल लोहार (२३) हा भारताच्या पराभवानंतर खूप दुःखी होता. या कारणामुळे त्याने रात्री ११ वाजताच गळफास घेऊन आत्महत्या केली. ओदिशाच्या जाजापूर भागात राहणाऱ्या २३ वर्षीय रंजन दासनेही भारताचा पराभव सहन न झाल्याने आत्महत्या केली. दासच्या काकांनी सांगितले की, तो इमोशनल डिसॉर्डर सिंड्रोमने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री जेव्हा भारताचा पराभव झाला तेव्हा दासला खूप मोठा मानसिक धक्का बसला आणि त्याने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणांत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.

हे ही वाचा:

कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात

पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा

विराटला भेटायला गेलेल्या तरुणाला अटक

अहमदाबादमध्ये अंतिम सामना सुरू असतानाच एक पॅलेस्टाइन समर्थक तरुण विराट कोहलीला भेटायला गेला होता आणि त्याने सामन्यात अडथळा आणला होता. या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो कोहलीचा चाहता असून पॅलिस्टिनी समर्थक आहे. त्यासाठी त्याने पॅलिस्टिनी समर्थक टी-शर्ट आणि मास्क परिधान केले होते. त्याचे नाव वेन जॉनसन असे आहे.

Exit mobile version