राजस्थानमध्ये ३५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका

१८ तास सुरू होते बचावकार्य

राजस्थानमध्ये ३५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका

राजस्थान येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला वाचवण्यात एनडीआरएफ आणि एसडीआरपीएफ पथकाला यश आले आहे. राजस्थानमधील दौसा येथे अवघ्या दोन वर्षांची चिमुकली ३५ फूट उघड्या बोअरवेलमध्ये पडली होती. तब्बल १८ तास हे बचावकार्य सुरू होते. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार राजस्थानमधील दौसा येथे बुधवारी (दि.१९) दोन वर्षीय मुलगी दौसाच्या बांदीकुई भागात उघड्या बोअरवेलमध्ये पडली होती. याची माहिती प्रशानासाला मिळताच जिल्हा प्रशासनाने बचाव मोहीम सुरू केली होती. तातडीने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे दोन वर्षीय चिमुकलीची सुटका करण्यात यश आले. तब्बल १८ तास हे बचावकार्य सुरु होते. बचावल्यानंतर चिमुकल्या लहान मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा..

ड्रोन मार्फत हेरॉईनची तस्करी, पंजाब पोलिसांकडून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त !

पाकिस्तान म्हणतो, ३७० कलमाबाबत आम्ही काँग्रेससोबत

बाणडोंगरी डीपी रोड; भातखळकरांची आणखी एक वचनपूर्ती

रोट्या बनवण्यापूर्वी आलम त्यावर थुंकायचा, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

एसपी रंजिता शर्मा म्हणाले की, “आम्ही १८ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर मुलीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यशस्वी झालो. याचा खूप आनंद आहे. हे बचावकार्य पूर्ण करणं खूप कठीण काम होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांमुळे मुलीला वाचवण्यात यश आले. मुलीला सध्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचे आम्ही आभार मानू इच्छितो.” एनडीआरएफचे योगेश कुमार म्हणाले की, “मुलगी बोअरवेलमध्ये अडकली होती. तिला सोडवण्यासाठी समांतर मार्ग खोदण्यात आला होता. एकूण ३० लोकांचे पथक या बचावकार्यात सहभागी होते.”

Exit mobile version