गडचिरोली मधून चांगली बातमी समोर आली आहे. दोन महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या दोनही नक्षली महिलांवर सरकारकडून १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या दोघींवर मिळून तब्बल ५६ गुन्ह्यांची नोंद आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपसस्थितीत ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये विमलाचंद्र सिडम उर्फ ताराक्काचा समावेश आहे. विमलाचंद्र सेडम उर्फ ताराक्का या ३८ वर्ष माओवादी संघटनेत कार्यकरत होत्या.
या सर्व नक्षलवाद्यांवर कोट्यवधी रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसनाकरिता शासनाकडून एकत्रितरित्या ८६.५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. एकत्रितरित्या ११ जणांनी आत्मसमर्पण केल्यामुळे १० लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून मिळणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
याच मालिकेत आज (८ जानेवारी) दोन महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शामला पुडो उर्फ लीला आणि काजल मंगरु वड्डे उर्फ लीम्मी असे आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत. शामलावर एकूण ४५ गुन्हे दाखल असून तिच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. तर काजलवर ८ गुन्हे दाखल असून तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य सरकारकडून या दोघींना पुनर्वसनासाठी अनुक्रमे साडे पाच लाख आणि साचे चार लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे.
हे ही वाचा :
एकनाथ शिंदेनाही राज यांचे वावडे?
सर्व वाद बाजुला ठेवा आणि ‘इमर्जन्सी’ पाहा!
‘दारूच्या व्यसनामुळे विनोद वारंवार संकटात सापडत गेला!’
दहशतवादी मोहम्मद शाहिद खानची जामीन याचिका फेटाळली