जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये लष्कराचे चार जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. सर्व जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी सध्या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम राबवली जात आहे. सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर कुलगामच्या आदिगाम भागात शोध मोहीम राबवण्यात आली. सुरक्षा दल दहशतवाद्यांची घरोघरी झडती घेत होते. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात चार जवानासह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सुरक्षा दलांकडून अजूनही शोधमोहीम सुरूच आहे.
हे ही वाचा :
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; जैश-ए-मोहम्मदच्या ६ सहकाऱ्यांना अटक!
दहशदवादी गोळ्या झाडायचे तेव्हा काँग्रेस पांढरे झेंडे दाखवायची
‘मोहम्मद युनूस’ हे हिंदूंचे मारेकरी!
अतिरेकी धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई ‘हाय अलर्टवर’
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून दोन टप्पे पार पडले आहेत, तर उर्वरित शेवटचा तिसरा टप्पा १ ऑक्टोबरला होणार आहे. मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सुरक्षा दलांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे.