पुणे आणि दानापुर दरम्यान दोन नवीन विशेष गाड्या

पुणे आणि दानापुर दरम्यान दोन नवीन विशेष गाड्या

पुणे आणि दानापुर दरम्यान दोन नवीन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोरोना संकटामुळे प्रवाशांच्या कमतरतेमुळे एका बाजूला रेल्वेला आपल्या अनेक सेवा रद्द कराव्या लागत आहेत, तर दुसरीकडे उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांतील प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वेला सातत्याने विशेष गाड्या चालवाव्या लागत आहेत. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे मध्य रेल्वेने पुण्याहून बिहारमधील दानापूर येथे जाणारी विशेष रेल्वे चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

पुणे- दानापुर विशेष
०१४९३ सुपरफास्ट विशेष गाई दिनांक १२ मे २०२१ रोजी रात्री ९.३० वाजता पुण्याहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.४० वाजता दानापुर येथे पोहोचेल तर राजे परतीची ०१४९४ विशेष सुपरफास्ट गाडी दानापुर येथून दिनांक १४ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.२० वाजता पुणे स्थानकात पोहोचेल. ही ट्रेन दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, प्रयागराज छोकी जंक्शन, पंडीत दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा या स्थानकांवर थांबणार आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस पक्ष कांगावखोर, कद्रू, नकारात्मकता पसरवणारा

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांचा सवाल

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

मराठा आरक्षण केंद्रावर ढकलण्याची प्रक्रिया सुरू

या ट्रेनमध्ये सेकंड क्लास प्रकारचे २० कोच असणार आहेत. या गाड्या पूर्णपणे आरक्षित स्वरूपाच्या असणार आहेत. या गाड्यांच्या आरक्षणाची नोंदणी www.irctc.co.in या वेबसाईट वर १२ मे २०२१ रोजी सुरु होईल.

Exit mobile version