अरुणाचल प्रदेशात तैनात असलेले दोन लष्करी जवान गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहेत. दोन्ही जवान सातव्या गढवाल रायफल्सचे असून ते उत्तराखंडचे रहिवासी आहेत. हरेंद्र नेगी आणि प्रकाश सिंह राणा अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही जवान २८ मे रोजी बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांची कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र याप्रकरणी लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
संपर्क झाला नसल्याने दोन्ही जवानांचे कुटुंबीय काळजीत आहेत. राणा बेपत्ता झाल्यानंतर त्यांची पत्नी ममता आणि दोन मुले अनुज (१०) आणि अनामिका (७) यांच्यासह संपूर्ण कुटुंब अतिशय चिंतेत आहे. २९ मे रोजी प्रकाशसिंग राणा बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी राणाच्या घरच्यांना याबबत माहिती दिली होती. राणा हा मूळचा रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ येथील रहिवासी आहे. राणाच्या पत्नी ममता यांच्या म्हणण्यानुसार, ९ जून रोजी त्यांना लष्कराकडून दुसरा फोन आला आणि त्यात दोन्ही जवान नदीत बुडाले असावेत, असे सांगण्यात आले.
हे ही वाचा:
शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर निवडून आला असता!
प्रयागराज हिंसाचाराचा सूत्रधार जावेदच्या घरावर बुलडोझर
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा द्या’
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ नेपाळमध्ये एकत्र आले हिंदू
मात्र इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हरेंद्र नेगी यांची पत्नी पूनम नेगी यांनी सांगितले की, दोन्ही सैनिक नदीवर गेले आणि कोणालाही कळले नाही यावर विश्वास बसत नाही आहे. हरेंद्र नेगी आणि त्यांची पत्नी पूनम नेगी यांना एक वर्षाचे मूल असून त्यांच्या लग्नाला केवळ तीन वर्षे झाली आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार सहदेव सिंह पुंडिर यांनी शुक्रवारी तेथील सैनिक कॉलनीतील राणा यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली आहे.