दोन प्रश्नपत्रिकांमधील सारख्या प्रश्नांची ‘दंत’कथा

दोन प्रश्नपत्रिकांमधील सारख्या प्रश्नांची ‘दंत’कथा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मुखशल्य चिकित्साशास्त्र एमडीएस अंतिम वर्षे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे दोन पेपर घेण्यात आले. अभ्यासक्रमातील पेपर १ हा १८ ऑगस्टला झाला, तर पेपर २ हा २० ऑगस्टला झाला. या दोन्ही पेपरमधील ८० टक्के प्रश्न हे सारखेच होते. याबाबत विद्यार्थ्यांनी तातडीने आक्षेप नोंदवल्यावर विद्यापीठाने तोच पेपर सोडवण्याची सूचना केली.

मुखशल्य चिकित्साशास्त्र एमडीएस अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम हा तीन पेपरमध्ये विभागलेला असतो. पेपर एक मध्ये ‘मायनर ओरल सर्जरी’, आणि ‘माग्झिलोफेशियल ट्रामा’ तर पेपर दोन मध्ये ‘कॅन्सर’ आणि ‘जी.एम.जे. आर्थोस्कोपी’सह मुख्य शल्य चिकित्साशास्त्रसंबंधी काही विषय येतात. पेपर दोनच्या प्रश्नपत्रिकेत पेपर एक मधील ७० ते ८० टक्के प्रश्न सारखे होते.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही

सीताराम कुंटे यांनीच टॅपिंगला मंजुरी दिली होती, मग…

मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह

अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?

याबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर परीक्षकांनी आरोग्य विद्यापीठाला सूचना केली. ३० मिनिटे बसवून ठेवल्यावर दिलेला पेपर योग्य आहे आणि तोच सोडवण्याची सूचना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिली. ७० ते ८० टक्के प्रश्न हे पेपर एक मधील अभ्यासक्रमाच्या आधारे विचारले गेले. त्यामुळे तीन वर्षांपासून चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. ही चूक विद्यापीठाची असल्यामुळे पेपर पुन्हा होणार का, असा सवाल काही विद्यार्थ्यांनी विचारला आहे.

काही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर मॉडरेटरला विचारणा केली असता पेपर योग्य असल्याचे स्पष्ट झाले. नियमांनुसार एका अभ्यासक्रमाचे प्रश्न हे दुसऱ्या अभ्यासक्रमाच्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास सात दिवसांच्या आत परीक्षा नियंत्रकाकडे ते नोंदवू शकतात. त्यावर विचार करून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी सांगितले.

Exit mobile version