‘आयपीएल’मध्ये आणखी दोन संघ मैदानात उतरणार!

‘आयपीएल’मध्ये आणखी दोन संघ मैदानात उतरणार!

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२२ हंगामापासून दोन नवीन संघ समाविष्ट केले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दोन नवीन संघांचा लिलाव १७ ऑक्टोबर रोजी करणार असून हे संघ खरेदी करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. लिलाव प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

आयपीएल प्रशासकीय समितीने ३१ ऑगस्ट रोजी दोन नव्या संघांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. हे संघ कोणत्या शहरांचे प्रतिनिधित्व करणार आहेत हे १७ ऑक्टोबरला ठरणार आहे. संघमालकांपुढे अहमदाबाद, लखनौ आणि पुणे यांसह अन्य काही शहरांचा पर्याय असेल. आयपीएल सध्या आठ संघांमध्ये खेळली जाते, परंतु पुढील वर्षापासून ही स्पर्धा १० संघामध्ये खेळली जाणार आहे.

हे ही वाचा:

आयफोन १३ लॉंच, काय आहेत नवीन फीचर्स?

दोन दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव अर्ध्यावर?

पाकिस्ताननेच आम्हाला अफगाणिस्तानमध्ये फसवले

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद

बीसीसीआयच्या सूत्राकडून पीटीआय वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, “कोणतीही कंपनी ७५ कोटी रुपये देऊन बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. यापूर्वी दोन नवीन संघांची मूळ किंमत १७०० कोटी रुपये मानली जात होती, परंतु आता मूळ किंमत २००० कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ ३००० कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना बोली प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी असेल. तीनपेक्षा जास्त कंपन्यांना गट तयार करण्याची परवानगी दिली जाणार नाही, परंतु जर तीन कंपन्यांना एकत्र येऊन एखाद्या संघासाठी बोली लावायची असेल तर त्यासाठी परवानगी मिळू शकते.

Exit mobile version