‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’, याच उत्तम उदाहरण वसई येथे घडलं आहे. यामध्ये त्वचादान, देहदान आणि अवयवदान केल्यामुळे रुग्णांना जगण्यासाठी आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. समाजात अंधश्रद्धा किंवा गैरसमजुतीमुळे अवयवदान करण्याकडे लोक पाठ फिरवतात. पण वसईत राहणाऱ्या ८० वर्ष पार केलेल्या उमेळे गावातील शालिनी वर्तक (८०) आणि बाभोळाच्या कुमुदिनी वनमाळी (८३) यांनी मात्र त्वचादान आणि देहदान करून जगासमोर आदर्श निर्माण करून दिला आहे.
वसई पश्चिमेकडील उमेळे गावातील शालिनी वर्तक आणि बाभोळाच्या कुमुदिनी वनमाळी यांचे सोमवारी निधन झाले. शालिनी वर्तक यांनी दीड वर्षांपूर्वी देहदान आणि त्वचादान करण्याचा निर्णय घेतला होता. वर्तक यांचा मुलगा विनीत, मुलगी चुरी आणि घरातील सदस्यांनी यांच्या निर्णयाचा आदर केला. मात्र शालिनी वर्तक यांचे निधन झाल्यावर मुलगा विनीत याने देहदान प्रणेतेचे चळवळीचे प्रणेते पुरषोत्तम पाटील पवार यांना त्याची कल्पना दिली. नियमांनुसार प्रक्रिया करून त्यांचे त्वचादान आणि देहदान करण्यात आले.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात ‘या’ सेवा मिळणार मोफत
गाेव्यामध्ये काॅंग्रेसचे आठ आमदार ‘पदयात्रा’ करत भाजपात
आमदार बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
तसेच बाभोळाच्या कुमुदिनी वनमाळी यांचे निधन झाल्यावर, प्रकाश वनमाळी यांनीही आईचे त्वचादान करण्याचा निर्णय कुटुंबियांसोबत चर्चा करून घेतला. त्याआधारे वसईत एकाच दिवसात दोन त्वचादान आणि एक देहदान करण्यात आले. त्वचादान, देहदान आणि अवयवदान केल्यामुळे अनेक गरजू रुग्णांच्या कामी येते. आज समाजात अवयवदानाविषयी सकारात्मक विचारांचे बीज पेरले जात आहे. त्याला प्रतिसाद ही चांगल्या प्रमाणात मिळत आहे. एकाच दोन मातांनी त्वचादान आणि देहदान करून जगासमोर एक चांगला आदर्श घालून दिला आहे. असे मत द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन चे संस्थापक पुरषोत्तम पाटील पवार यांनी मांडले.