हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित आणखी दोन गटांनी फुटीरतावादाचा केला त्याग

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती

हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित आणखी दोन गटांनी फुटीरतावादाचा केला त्याग

जम्मू आणि काश्मीरसंबंधी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बऱ्याच काळापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी देणाऱ्या हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित आणखी दोन गटांनी फुटीरतावादाचा मार्ग सोडल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही गटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनावर आणि त्यांच्या नवीन भारताच्या स्वप्नावर विश्वास व्यक्त केला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, “काश्मीर खोऱ्यातून आणखी एक मोठी आनंदाची बातमी. हुर्रियतशी संलग्न असलेले आणखी दोन गट, जम्मू-काश्मीर तहरीक-ए-इस्तेकलाल आणि जम्मू-काश्मीर तहरीक-ए-इस्तेकामत यांनी फुटीरतावादाचा त्याग केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या नवीन भारताच्या स्वप्नावर विश्वास व्यक्त केला आहे. मोदी सरकारच्या काळात, फुटीरतावाद शेवटचा श्वास घेत आहे आणि संपूर्ण काश्मीरमध्ये एकतेचा विजय गूंजत आहे,” अशा भावना अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.

जम्मू-काश्मीर तहरीक-ए-इस्तेकलालचे प्रमुख गुलाम नबी सोफी यांनी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स किंवा अशीच विचारसरणी असलेल्या इतर कोणत्याही फुटीरतावादी संघटना किंवा गटापासून औपचारिकपणे वेगळे होण्याची घोषणा करताना म्हटले की, सर्व अडचणी असूनही आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवला, परंतु एपीएचसी (गिलानी) किंवा एपीएचसी (मिरवाईज) दोघेही सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. लोकांच्या आकांक्षा आणि भावनांचे प्रतिनिधित्व करण्यात ते प्रत्येक टप्प्यावर अपयशी ठरले.

दोन दिवसांपूर्वीचं, मंगळवारी, गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली होती की, हुर्रियत कॉन्फरन्सचे दोन गट असलेले जम्मू आणि काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (जेकेपीएम) आणि जम्मू आणि काश्मीर डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंट (जेकेडीपीएम) यांनी फुटीरतावादाशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. तसेच याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित, शांततामय आणि एकसंघ भारताच्या दृष्टिकोनाचा मोठा विजय असे संबोधले होते.

हे ही वाचा:

राष्ट्राध्यक्ष पुतीन लवकरच येणार भारत दौऱ्यावर

अर्थसंकल्पिय अधिवेशन निरर्थक, अपयश लपवणारे!

बलुचिस्तानमधील संघर्ष, परराष्ट्र धोरणावरून इम्रान खान यांनी पाक सरकारला सुनावले

नाशिकमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे १८१ ‘बांगलादेशी’ लाभार्थी; एफआयआर दाखल

२०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर मोदी सरकार फुटीरतावादी गटांना मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करत आहे. त्याच वेळी, देशविरोधी कारवाया आणि दहशतवाद आणि फुटीरतावादाला पाठिंबा दिल्याच्या आरोपाखाली काही संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे.

फाजिलपणा हेच पक्षकार्य ? | Mahesh Vichare | Anil Parab | Uddhav Thackeray | Sushma Andhare |

Exit mobile version