कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या चित्त्याच्या चार बछड्यांपैकी आता एक जिवंत

उष्णतेमुळे तसेच कमकुवतपणामुळे बछड्यांचा झाला मृत्यू

कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या चित्त्याच्या चार बछड्यांपैकी आता एक जिवंत

मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात गुरुवारी ज्वाला या चित्त्याच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू झाला. आता चार बछड्यांपैकी केवळ एक जिवंत राहिले आहे. ज्वालाने २४ मार्चला चार पिल्लांना जन्म दिला होता.

ज्वालकाच्या पहिल्या बछड्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला होता. आता गुरुवारी आणखी दोन चित्त्याच्या पिल्लांचा मृत्यू झाला. ज्वाला (सियाया) चित्त्याने २४ मार्च रोजी चार पिल्लांना जन्म दिला होता. कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या म्हणण्यानुसार, नव्याने जन्मलेल्या तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे, तर चौथ्या चित्त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. पहिले शावक अशक्तपणामुळे मरण पावले होते, असे वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. “चित्त्याची सर्व शावके अशक्त आणि कमी वजनाची होती.

ज्वाला ही मादी चित्ता हुंद रियाध जातीची आहे. चित्त्याचे शावक जवळजवळ आठ आठवड्यांचे झाल्यावर, त्यांच्या आईच्या भोवती राहण्याची इच्छा बाळगतात. त्यांनी आठ ते १० दिवसांपूर्वीच त्यांच्या आईसोबत फिरायला सुरुवात केली होती. चित्ता तज्ज्ञांच्या मते, आफ्रिकेत चित्त्याचे शावक जिवंत राहण्याची टक्केवारी सहसा खूप कमी असते. नियमानुसार, या शावकांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे, असे वनअधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

संसद भवनाच्या उद्घाटनाविरोधातली याचिका फेटाळत न्यायालयाने ओढले ताशेरे

त्याने तब्बल ९४ हजार एमपीएससी हॉल तिकिटे हॅक केली! 

शास्त्रीय नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांनी सर्वप्रथम पंतप्रधानांना दिली ‘सेंगोल’ची कल्पना

असा असेल संसद भवन उदघाटन कार्यक्रम; पूजा, सेंगोल प्रतिष्ठापना, पंतप्रधानांचे संबोधन

मादी चित्ता निरोगी असली तरी तीदेखील निरीक्षणाखाली असल्याचे अभयारण्याच्या वतीने सांगण्यात आले. दोन शावकांच्या मृत्यूमुळे कुनोमध्ये गेल्या दोन महिन्यांत झालेल्या शावकांच्या मृतांची संख्या सहापर्यंत पोहोचली आहे, ज्यात आफ्रिकन देशांतून आलेल्या तीन प्रौढ चित्त्यांचा समावेश आहे. दोन शावक चित्यांच्या मृत्यूनंतर, कुनो नॅशनल पार्कमध्ये फक्त एकच पिल्लू शिल्लक आहे.

प्रथम नामिबियाचा चित्ता, साशा मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने २७ मार्च रोजी मरण पावला, तर दुसरा चित्ता, दक्षिण आफ्रिकेचा उदय, १३ एप्रिल रोजी मरण पावला. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या दक्षा या मादी चित्त्याचा ९ मे रोजी मिलनाप्रसंगी नर चित्त्याशी झालेल्या हिंसक वादामुळे झालेल्या दुखापतीत मृत्यू झाला होता.

Exit mobile version