प्रवाशांचे होणार मेगा हाल! मध्य रेल्वेवर ६३ तास आणि ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक

सीएसएमटी आणि ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे होणार काम

प्रवाशांचे होणार मेगा हाल! मध्य रेल्वेवर ६३ तास आणि ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर १ जून आणि २ जून रोजी तब्बल ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १० आणि ११ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मचे आणि ठाणे स्थानकातील ५ आणि ६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या या कामामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या कालावधीत मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत तर, ८९० लोकल फेऱ्या अंशत: रद्द असतील. तसेच ७४ रेल्वे गाड्या रद्द होणार असून १२२ रेल्वेगाड्या अंशत: रद्द होणार आहेत. परिणामी, मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.

सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ वर सध्या १६ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबतात पण, या प्लॅटफॉर्मवर २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्स्प्रेस रद्द, तर अंशत: रद्द करण्यात आल्या असून आता त्याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे.

शनिवारच्या दिवशी सुट्टीकालीन वेळापत्रक चालविण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. तर, ठाणे येथील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी रात्रीपासून ते रविवारपर्यंत मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

हे ही वाचा:

डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी फाडला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो!

मुख्यमंत्री शिंदेंविरोधातला ‘रोखठोक लेख’ राऊतांना भोवणार!

‘आप’ने झटकले हात, “काँग्रेससोबतची आमची युती कायमची नाही!”

ब्लॉक १

ब्लॉक २

ब्लॉक कालावधीत पूर्णपणे बंद असणाऱ्या सेवा

शुक्रवारी मध्य रेल्वेवरील १६१ लोकल फेऱ्या रद्द

शनिवारी मध्य रेल्वेवरील ५३४ लोकल फेऱ्या रद्द आणि ६१३ लोकल अंशतः रद्द

रविवारी मध्य रेल्वेवरील २३५ लोकल फेऱ्या आणि २७० लोकल अंशतः रद्द

Exit mobile version