26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषदोन लाख मोबाईल नंबर ब्लॉक, १४ गावांवर छापे

दोन लाख मोबाईल नंबर ब्लॉक, १४ गावांवर छापे

झारखंडमधील जामताडा हे सायबर क्राईमचे केंद्र

Google News Follow

Related

दिल्लीला लागून असलेल्या ‘नया जामतारा’ म्हणजेच मेवातमध्ये सायबर गुंडांवर हरियाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजस्थान आणि यूपीच्या सीमेला लागून असलेल्या मेवात येथील १४ गावांवर पोलिसांनी छापे टाकले आहेत. या दरम्यान १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर सायबर फसवणुकीत वापरले जाणारे २ लाखांहून अधिक मोबाइल नंबर पोलिसांनी बंद केले आहेत. या छाप्यात गुरुग्रामच्या एसीपीde सायबरच्या देखरेखीखाली ५००० पोलीस सहभागी झाले होते.

दिल्लीला लागून असलेल्या या भागातून देशभरात सातत्याने सायबर गुन्ह्यांच्या घटना घडत होत्या. नुकतेच केंद्र सरकारने मेवात, भिवानी, नूंह, पलवल, मनोटा, हसनपूर, हथन गावांसह ९ राज्यांमध्ये ३२ सायबर क्राइम हॉटस्पॉट ओळखले होते.

१४ गावांमध्ये छापे टाकले

वारंवार सायबर घटनांच्या तक्रारी आल्यानंतर भोंडसी पोलिस केंद्रात गोपनीय पातळीवर या गावांमध्ये छापे टाकण्याची रणनीती आखण्यात आली होती. त्यानंतर १०२ पथकांनी १४ गावांना घेराव घालून छापे टाकले. महू, मेवातमधील पुन्हाना, पिंगवा, बिचूर आणि फिरोजपूर, तिरवाडा, गोकलपूर, लुहिंगा काला, अमीनाबाद, नई, खेडला, गडौल, जेमंत, गुलाटा, जाखोपूर, पापडा, मामलिका या गावांमध्ये छापे टाकण्यात आले. यादरम्यान १४ डीएसपी आणि ६ एएसपींनी १०२ टीम तयार केल्या होत्या. या पथकांमध्ये सुमारे चार ते पाच हजार पोलिस सामिल होते. इतकंच नाही तर या सर्व गावांना चारही बाजूंनी घेरून छापे टाकण्यात आले.

आतापर्यंत झारखंडमधील जामताडा हे सायबर क्राईमचे केंद्र मानले जात होते. परंतु अलीकडेच सरकारने म्हटले होते की, देशातील ९ राज्यांमध्ये तीन डझनहून अधिक गावे आणि शहरे सायबर क्राइमचा बालेकिल्ला बनली आहेत.  सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशातील हरियाणा, दिल्ली, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश हे सायबर क्राईम हॉटस्पॉट आहेत.

हेही वाचा :

जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

२ कोटी लोकांना एफएम सुरांची भेट

एअर इंडियात होणार एक हजार वैमानिकांची भरती

गुंड अतीक अहमदच्या घराच्या जागेवर ७६ कुटुंबांसाठी घरे!

झारखंडचे जामताडा फसवणुकीचे केंद्र 

गेल्या काही वर्षांपासून झारखंडमधील जामताडा हे सायबर फसवणुकीचे केंद्र मानले जात आहे. जामताड्यात अशी अनेक गावे आहेत जिथून शेकडो गुंड देशभरात सायबर फसवणुकीच्या घटना घडवतात. ते लोकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करतात आणि त्यांची बँक खाती रिकामी करतात. जामताड्याचे सायबर गुंड देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. यावर नुकतीच एक वेब सीरिजही बनवण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा