जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये मंगळवारी (२४ डिसेंबर) झालेल्या लष्करी वाहनाच्या अपघातात पाच जवान हुतात्मे झाले. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातात हुतात्मा झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील मानकोट सेक्टरमधील बालनोई भागात भारतीय लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. माहितीनुसार, लष्कराचे जवान एका वाहनातून त्यांच्या चौकीकडे जात असताना वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. वाहनामध्ये १० जवान होते. अपघातात पाच जवान हुतात्मा झाले तर पाच जवान जखमी झाले.
हे ही वाचा :
कल्याण:अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!
हरियाणात ख्रिसमसचा कार्यक्रम विहिंप, बजरंग दलाने उधळवला, हनुमान चालीसाचे पठण
भाजपाला गतवर्षी पेक्षा तीनपट अधिक धनलाभ! २,२४४ कोटी रूपयांच्या देणग्या
ख्रिसमससाठी सांताक्लॉज बनून डिलीव्हरी करता तर, हिंदू सणांच्यावेळी भगव्या रंगाचा पोशाख घालून जाता का?
सुभेदार दयानंद तिरकन्नवर, लान्स हवालदार अनूप, नाईक घाडगे शुभम समाधान, शिपाई निकुरे दिगंबर, महेश मेरिगोंड अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवान आहेत. सातारा जिल्ह्यातील कामेरी गावाचे जवान शुभम समाधान घाडगे (२८) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अक्षय दिगंबर निकुरे (२७).
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीटकरत म्हटले, जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ येथे एका दुर्दैवी अपघातात कर्तव्यावर असताना लष्कराचे ५ जवान शहीद झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. यातील २ सैनिक हे महाराष्ट्रातील आहेत. मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातील कामेरी या गावातील असून, सिपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. राज्य सरकारच्या वतीने या दोघांच्या वारसांना १ कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्यात येतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ येथे एका दुर्दैवी अपघातात कर्तव्यावर असताना लष्कराचे 5 जवान शहीद झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
यातील 2 सैनिक हे महाराष्ट्रातील आहेत. मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा… https://t.co/JeLgT0RG06— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 25, 2024