30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषदोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब

दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब

सहा जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

अमेरिकेतील टेक्सासमध्ये आकाशात दोन विमाने एकमेकांवर आदळली आहेत. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओही समोर आला आहे. हवेत टक्कर झालेली ही दोन्ही विमाने विंटेज लष्करी विमाने होती जी टेक्सासमधील डॅलस शहरात एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. एअर शोमध्ये कसरत करत असताना दोन्ही विमाने हवेत आदळले. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हा अपघात १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास झाला. टेक्सासमधील डॅलसमध्ये विंटेज एअर शो सुरू होता. एक बोईंग बी-१७ विमान हवेत कसरत करत असताना अचानक बेल पी-६३ नावाचे दुसरे विमान या विमानाजवळ आले आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच दोघांची टक्कर झाली. विमानाचे भाग कोसळल्यावर आगीचा डोंब उसळला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४० पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून ढिगाऱ्यांपासून जीव वाचवण्याचे काम सुरू आहे. दोन्ही विमानात पायलटसह ६ जण होते. या सर्व ६ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये दोन विमाने हवेत आपटताना दिसत आहेत. दोन्ही विमाने आकाशात हवाई कसरती असताना अचानक त्यांची टक्कर झाली आणि आकाशात कला धूर लोटला. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

हे ही वाचा:

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

वांगं तेच, बिरबल आणि राऊतांची मजबुरीही सारखीच….

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

एअर शोमध्ये एवढी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यावसायिक वैमानिकांनी एवढी मोठी चूक कशी केली. ज्या विमानांच्या जोरावर मित्र राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव केला होता, ती विमाने एवढ्या निष्काळजीपणे कशी आदळली. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन मंत्र्यांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळू शकतील असे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा