23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषभारताच्या दाेन महिला धावपटू उत्तेजक चाचणीत आढळल्या दाेषी; राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार

भारताच्या दाेन महिला धावपटू उत्तेजक चाचणीत आढळल्या दाेषी; राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार

Google News Follow

Related

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा अवघ्या आठ दिवसांवर आलेली असताना या स्पर्धेला गालबाेट लागले आहे. भारतासाठी पदकाच्या प्रबळ दावेदार गणली जाणारी धावपटू एस. धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर काेरलेली ऐश्वर्या बाबू या दाेन महिला खेळाडू उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत (डाेप टेस्ट) दाेषी आढळून आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रकूल स्पर्धा सुरू हाेण्याच्या आधीच भारताला माेठा धक्का बसला आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने घेतलेल्या चाचणीत त्यांनी स्टेरॉइड्स सेवन केल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे आता या दाेन्ही खेळाडूंना राष्ट्रकूल स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

या स्पर्धेमध्ये एस धनलक्ष्मी शंभर मीटर आणि चार बाय शंभर मीटरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होती. युजीन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी देखील ती भारतीय संघातही होती. पण व्हिसाच्या अडचणीमुळे जाऊ शकली नव्हती. धनलक्ष्मीने २६ जून रोजी कोसानोव्ह मेमोरियल अ‍ॅथलेटिक्स मीटमध्ये २०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी ऐश्वर्या बाबूचे नमुने घेतले होते. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चेन्नईत झालेल्या स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर करणारी ऐश्वर्या देखील आता या स्पर्धेत सहभागी हाेऊ शकणार नाही.

हे ही वाचा:

आता ६० देशात विनाअडचण प्रवास करा!

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती


भारतातून २३० खेळाडूंचा सहभाग

२८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या ठिकाणी ७२ देशांतील जवळपास चार हजार ५००खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातून देखील जवळपास २३० खेळाडूंचा सहभाग असलेला चमू बर्मिंगहॅमला जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा