राज्यात मुंबईसह इतर उपनगरात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान मुंबईतील मिठी नदीत दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण बेपत्ता आहे. पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जात आहे. जावेद आणि आसिफ अशी या दोन तरुणांची नावे आहेत.
माहीम कॉजवे येथील मिठी नदीत कुर्ला येथील दोन तरुण बुडाले. गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी कुर्ला येथून हे दोन तरुण माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. यावेळी हे दोन मित्र लघुशंकेसाठी माहीम खाडीजवळ उभे होते. दरम्यान, एकाचा पाय सरकल्याने एक तरुण खाली पडला आणि त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला असता दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
हे ही वाचा:
‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी
धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या
मध्यरात्री भरती असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आलं नाही. मात्र, सकाळी पाणी ओसरताच एका तरुणाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला. तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे. मुंबईत पाऊस असल्याने दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अडचण येत आहे.