24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषमालवणमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली बोट बुडाली; दोन मृत्युमुखी

मालवणमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली बोट बुडाली; दोन मृत्युमुखी

Google News Follow

Related

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. २० पर्यटकांना घेऊन ही बोट स्कुबा डायव्हिंगसाठी गेली असता परतीच्या मार्गावर असताना ही बोट किनाऱ्याजवळ बुडाली. या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मंगळवार, २४ मे रोजी दुपारी ‘जय गजानन’ ही बोट जवळपास २० पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन परत येताना समुद्रकिनाऱ्याजवळ ही बोट बुडाली. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. सहा पर्यटकांना मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बोटीतील इतर सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे.

दरम्यान, बोटीतील पर्यटक हे मुंबई आणि पुण्याचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. समुद्रात मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. या लाटांपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरु होता. तेव्हा एक लाट बोटीवर आली आणि बोट एका बाजूने कलंडल्याची माहिती बोटीतील प्रत्यक्षदर्शी पर्यटकाने दिली आहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीर पोलिस पदकावरील शेख अब्दुल्लांचे चित्र हटवले; आता अशोकस्तंभ दिसणार

‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’

बांगलादेशी मतदार तृणमुलच्या उमेदवार

‘पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा’

प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून बोट चालक आणि मालकावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या बोटीची प्रवाशी मर्यादा किती होती? लाईफ जॅकेट देण्यात आले होते का? याची चौकशी करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा