23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषवरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

वरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत मृत्यु झाला होता

Google News Follow

Related

मुंबईतील वरळी या ठिकाणी असलेल्या फोर सीजन या तारांकित हॉटेल शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ४२ व्या मजल्या वरून मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिमेंटचे ब्लॉक कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यु झाला असून अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरळीतील गांधी नगर या ठिकाणी असलेल्या पंचतारांकित हॉटेल ‘फोर सीजन’ च्या शेजारी फोर सीजन रेसिडेन्सी या ४२मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून बांधकासासाठी लागणारे सिमेंटचे काही ब्लॉक कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले, त्याच बरोबर परिसरात उभ्या असलेल्या वाहनावर हे ब्लॉक पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

पहाटेचा शपथविधी; पवार-ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा

महाशिवरात्रीला घ्या १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

बाबरपेक्षा स्मृती मानधना गब्बर

काश्मीरच्या लिथियम साठ्यावर दहशतवाद्यांचा डोळा

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच ना.म.जोशी. मार्ग पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नायर रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले आहे. शब्बीर (२५)आणि इम्रान (२४)या दुर्घटनेत मृत झालेल्या दोघांची नावे असल्याचे समजते हे दोघे एका एक्स्पोर्ट कंपनीत नोकरी होती अशीही माहीत समोर येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा