प्रशिक्षणादरम्यान सीआरपीएफच्या दोन जवानांना हृदयविकाराचा झटका

छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर दोघांना जमशेदपूर येथील मेडिट्रिना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान सीआरपीएफच्या दोन जवानांना हृदयविकाराचा झटका

झारखंडमध्ये प्रशिक्षणादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. प्रशिक्षणादरम्यान दोन्ही जवानांनी छातीत दुखत असल्याची तक्रार होती. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. सीआरपीएफ १३ बटालियनचे हवालदार प्रेमकुमार सिंह आणि बटालियन-७ चे शंभूराम गौर अशी मृत जवानांची नावे आहेत. प्रेमकुमार सिंग मणिपूरचे तर शंभूराम गौर बिहारचे होते. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर दोघांना जमशेदपूर येथील मेडिट्रिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान दोन तासांच्या अंतराने दोन्ही जवानांचा मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची भीती

सीआरपीएफ जवानाच्या आकस्मिक मृत्यूचे कारण सध्या स्पष्ट झाले नसून, लक्षणांच्या आधारे दोघांचाही मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जवान प्रेम कुमार सिंह आणि शंभूराम गौर हे सीआरपीएफच्या मुसाबनी झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असताना अचानक त्यांना छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध पडले. साथीदारांनी तातडीने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. याबाबत दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना ५० हजार फुटांवरून टिपणार

इलेक्ट्रिसिटी केबिनची आग इमारतीत पसरणार होती, पण दीपक देवदूत बनला!

चक्रीवादळ व्यवस्थापनात ओदिशा ठरलेय ‘रोल मॉडेल’

कर्नाटकात नेहरू, आंबेडकर परतले, सावरकर, हेडगेवारांना वगळले

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला

 

सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की घटनेच्या दिवशी जवानांना कठोर शारीरिक काम करण्यास भाग पाडले गेले नाही. २७५ जवानांपैकी २६५ जवानांनी बनलोपा येथील बटालियन-१९३ मुख्यालयातून प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. प्रशिक्षणानंतर साडेदहाच्या सुमारास दोन्ही जवानांना छातीत दुखू लागल्याने सर्व जवान आपापल्या बॅरेकमध्ये गेले.

Exit mobile version