महेश मांजरेकर यांच्याविरोधात दोन फौजदारी तक्रारी

महेश मांजरेकर यांच्याविरोधात दोन फौजदारी तक्रारी

‘नाय वरण भात लोनचा कोन नाय कोनचा’ या सिनेमात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप ठेवत सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात पोक्सो न्यायालयात फौजदारी तक्रार करण्यात आली आहे.

आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी ही तक्रार दाखल केली असून यापूर्वी माहीम पोलीस स्टेशनमध्येही अशी तक्रार करण्यात आली होती.

मात्र मुंबई पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्याने तक्रारदारांनी अखेर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर येत्या सोमवारी (३१ जानेवारी) सुनावणी होणार आहे. याच धर्तीवर सिनेमाचे प्रदर्शन तातडीने थांबवण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही याचिका दाखल करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त बांद्रा दंडाधिकारी न्यायालयातही मांजरेकर यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने ही तक्रार केली आहे. महेश मांजरेकर यांच्याविरोधात कलम २९२ (अश्लिलतेचा समावेश), कलम २९५, कलम ३४ याअंतर्गत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

स्वातंत्र्य लढ्यातील महिला सेनानींची ‘अमर चित्रकथा’

आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयाचे जंगी स्वागत

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने केली आत्महत्या

केरळ सरकारने तिला हिजाब घालण्यास केली मनाई! काय आहे प्रकरण…

 

याचिकाकर्त्या सीमा देशपांडे यांच्या वतीने खटल्यासाठी उभ्या राहिलेले वकील शौनक कोठेकर यांनी म्हणणे मांडले आहे की, प्रत्येक ट्रेलरसाठीही वेगळी यंत्रणा हवी आणि त्यांना वेगळे प्रमाणपत्र द्यायला हवे.

या चित्रपटात एका प्रौढ महिलेसोबत लहान मुलांचे लैंगिक संबंध असल्याचे दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून हे कायद्याला धरून नाही आणि हे लहान मुलांच्या पोर्नोग्राफीशी संबंधित असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Exit mobile version