26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषकिल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले

किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले

राज्यभर शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह

Google News Follow

Related

आज राज्यभर शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह आहे. किल्ले रायगडवर या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोल्हापुरमधील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंदा भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत.

श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर गर्दी करत आहेत. दरम्यान, रायगडावर प्रचंड गर्दी झाल्याने काही शिवभक्तांना गडावर जाता येत नसल्याची माहिती समोर आली आहे.

किल्ले रायगडावर सुमारे अडीच लाख भाविक जमल्याची माहिती समोर आली आहे. गडाच्या खाली जवळपास ५०- ७५ हजार शिवभक्त उभे असल्याचे वृत्त आहे. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये, असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

आज शिवराय छत्रपती झाले!

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट!

३२ वर्षांपूर्वी केलेल्या हत्येसाठी माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप! काय आहे नेमकं प्रकरण?

बेपत्ता लोकांच्या शोधाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांचे डोळे डबडबले!

शिवभक्तांच्या गर्दीमुळे किल्ल्यावर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे प्रशासनासमोरचं आव्हान आहे. सध्या गडावर असलेले लोक ९- १० च्या दरम्यान गड उतरतील, त्यानंतर खाली असलेल्या लोकांना वरती सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गड उतार होणार नाही, याची शाश्वती देतो, असं छत्रपती संभाजीराजे माध्यमांशी बोलतना म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा