नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू

अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरु असतानाच घडली घटना

नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू

नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रशिक्षणावेळी फायरिंग करत असताना स्फोट झाल्याने अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरु असतानाच तोफेचा बॉम्ब गोळा फुटल्याने ही दुर्घटना घडली. नाशिक शहरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाते. याचं पार्श्वभूमीवर आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांचा सराव सुरु होता. याच प्रशिक्षणादरम्यान फायरिंग करत असताना अचानक स्फोट झाला. यामुळे आर्टिलरी सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. गोहिल सिंग आणि सैफतत शीत असे या अग्निवीरांची नावे असून हे स्फोट झाल्यानंतर जखमी झाले. यानंतर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : 

मसुरीतील चहा थुंकी प्रकरण: मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसनला बेड्या!

महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक

बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणकाम मजुरांवर गोळीबार; २० जण ठार

पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला देवी कालीचा मुकुट बांगलादेशातील मंदिरातून गेला चोरीला

दरम्यान, भारत सरकारने सैन्यदलात सेवा बजावण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. याअंतर्गत तोफखाना केंद्रात देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मागील वर्षी दाखल झाले होते. प्रशिक्षण देत असतानाच तोफ गोळ्याचा ब्लास्ट झाला. या घटनेत दोन जवांनाचा मृत्यू झाला आहे. देवळाली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Exit mobile version