ट्विटर इंडिया प्रमुखांची उचलबांगडी

ट्विटर इंडिया प्रमुखांची उचलबांगडी

ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांची भारतातून बदली करण्यात आली आहे. त्यांना मायक्रो ब्लॉगिग साइट ट्विटरने पुन्हा अमेरिकेला बोलवले आहे. अमेरिकेत त्यांना नवी जबाबदारी देण्यात येणार आहे. भारतात जेव्हा कॉंग्रेस आणि ट्विटरमधील वाद विकोपाला गेला असताना माहेश्वरी यांची बदली करण्यात आले आहे.  आजच राहुल गांधींनी ट्विटरवर अनेक आरोप केले आहे.

ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालक पदी म्हणून नियुक्त झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी ट्विटर इंडिया प्रमुख मनिष माहेश्वरी यांना अमेरिका स्थित ट्विटर ऑपरेशनच्या कामासाठी बोलावले आहे. मनीष माहेश्वरी यांनी १८ अप्रैल २००९ रोजी नेटवर्क १८ या संस्थेतून ट्विटर इंडियाला आले होते. आता ते अमेरिकेत सीनियर डायरेक्टर, रिवेन्यू स्ट्रेटजी अँड ऑपरेशन या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ट्विटरचे प्रवक्ता म्हणाले, मनीष माहेश्वरी हे ट्विटरमध्येच असणार आहे.  माहेश्वरी ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयात सीनियर डायरेक्टर, रिवैन्यू स्ट्रेटजी म्हणून काम पाहणार आहे.

राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर आता ट्विटरने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. ट्विटरने आता थेट काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केलं आहे. त्यामुळे ट्विटर आणि कॉंग्रेस हा वाद  भारतात विकोपाला पोहचला आहे.

हे ही वाचा:

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला

त्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला बेड्या

राहुल गांधींना निलंबित करा

कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?

ट्विटर आपल्या धोरणांबाबत निष्पक्षपणे काम करतं. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे फोटो शेअर करणाऱ्या सर्वांवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली आहे आणि या पुढेही सुरु राहिल. व्यक्तीच्या खासगीपणाला आणि सुरक्षेला ट्विटरकडून सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. कंपनीच्या धोरणानुसार, एखादे ट्वीट हे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असेल आणि अजूनही ते ट्वीट डिलीट केलं नसेल तर संबंधित अकाऊंट आम्ही तात्पुरत्या स्वरुपात बंद करु शकतो असे सांगत ट्विटरने स्पष्टीकरण दिले आहे.

Exit mobile version