जिहादी उस्मानी विरोधात नेटकऱ्यांचा संताप

जिहादी उस्मानी विरोधात नेटकऱ्यांचा संताप

निर्भीड पत्रकार रोहित सरदाना यांच्या मृत्यूनंतर त्यांची अवहेलना करणाऱ्या शर्जील उस्मानी या जिहादी विचारांच्या तरुणाविरोधात इंटरनेटवर आक्रोश व्यक्त केला जात आहे. उस्मानी याच्या विखारी वक्तव्याचा सारेच निषेध करत आहेत. यात सामान्य नेटकऱ्यांपासून ते अनेक प्रसिद्ध लोकांचा समावेश आहे.

रोहित सरदाना यांच्या अकाली निधनानंतर सारेच शोक व्यक्त करत होते. पण सरदाना यांच्या दुर्दैवी मृत्यूवर व्यक्त होताना उस्मानीने शोक व्यक्त करायचे दूरच उलट गरळ ओकली. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सरदाना यांच्या मृत्यूनंतर केलेल्या ट्विटवर उस्मानी व्यक्त झाला आहे. ‘असामाजिक, सतत खोटे बोलणारा आणि नरसंहाराला प्रोत्साहन देणारा असा तो होता. त्याला पत्रकार म्हणून लक्षात राहूच शकत नाही.’ असे ट्विट उस्मानीने केले.

हे ही वाचा:

जिहादी उस्मानीने पुन्हा ओकली गरळ

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

उस्मानीच्या या ट्विटनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या साऱ्याच कसेंट्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी शर्जीलचा समाचार घेतला आहे.

पत्रकार अभिसार शर्मा यांनी व्यक्त होताना “तुला शिव्या द्यायची पण इच्छा होत नाही. तू इतका घटिया आहेस”

तर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी “अशी पण माणसे असू शकतात?” असा सवाल केला आहे.

“कोणाच्याही मृत्यूवर खुश होणे हे दानवांचे काम आहे, मानवांचे नाही.” असे काँग्रेस पक्षाच्या छत्तीसगड मधील आमदार शकुंतला साहू यांनी म्हटले आहे.

“रोहितच्या मृत्यूबद्दल घाटिया पोस्ट लिहिणारे हे माणूस असूच शकत नाहीत” असे मत पत्रकार आशुतोष यांनी व्यक्त केलंय.

तर तेहसीन पूनावाला यांनी शर्जीलला ट्विट डिलीट करायची विनंती केली आहे. हे ट्विट स्विकारार्ह नाही. आपली लढाई एका अशा मोठ्या शत्रूशी आहे जो आपल्या सगळ्यांना त्रास द्यायला आला आहे असे पुनावाला यांनी म्हटले आहे.

 

 

 

Exit mobile version