पराग अग्रवाल यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच वैयक्तिक सुरक्षा धोरणात मोठा बदल केला आहे. कंपनीने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी आपल्या वैयक्तिक संरक्षण धोरणाचा विस्तार करत आहे. यापूर्वी ट्विटरवर युजर्स परवानगीशिवाय कोणाचाही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत होते, पण आता असे करता येणार नाही. त्यासाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे. या नव्या धोरणाचा उद्देश महिला वापरकर्त्यांसाठी सुरक्षित वातावरण प्रदान करणे हा आहे.
या समाज माध्यमांचा दुरुपयोग केला जातो आणि त्याचा विपरीत परिणाम हा महिला, अल्पसंख्यांक यांच्यावर होत असतो. हा दुरुपयोग रोखण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. ट्विटरवर पोस्ट केलेले व्हिडिओ आणि चित्रे शेअर करता येणार नाहीत किंवा त्यासाठी संबंधित व्यक्तींची संमती आवश्यक असेल असे नाही. परंतु, संबंधित कोणत्याही व्यक्तीला ते फोटो किंवा व्हिडिओ काढून टाकायचे असतील तर कंपनी ते करू शकते. ट्विटरने यापूर्वीच वापरकर्त्यांचे पत्ते, ओळख, वैद्यकीय डेटा, आर्थिक माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करण्यावर बंदी घातली आहे.
हे ही वाचा:
युक्रेनमध्ये नेटो ही धोक्याची घंटा
चन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत
आसाम, पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल ही चिंतेची बाब
सर्व कोरोना रुग्ण समान आहेत, पण काही रुग्ण इतरांपेक्षा अधिक समान आहेत
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत समीर वानखेडे यांच्यासंदर्भात अनेक फोटो, व्हिडिओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर वातावरण तापले होते. आता या नव्या नियमांमुळे असे फोटो, व्हिडिओ शेअर करणे शक्य होणार नाही, याची चर्चा आता सुरू झाली आहे.