एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आणि त्यांनी ट्विटरमध्ये ऐतिहासिक बदल घडवण्यास सुरुवात केली. ट्विटरवर ‘ब्लू टिक’ असणाऱ्यांना प्रति महिना पैसे मोजावे लागणार असं, एलॉन मस्क यांनी जाहीर केलं होत. या योजनेसंदर्भात त्यांनी आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. भारतात ट्विटर ब्लूचे रोलआउट या महिन्यात होऊ शकते अशी मस्क यांनी पुष्टी केली आहे.
ट्विटरवर आता ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे द्यावे लागतील आणि ‘ट्विटर ब्लू’ सेवेचे सदस्यत्व घेणाऱ्यांना ब्लू टिक दिली जाईल. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर हा बदल जाहीर केला. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी या महिन्यात भारतात ट्विटर ब्लू लाँच होणार असल्याचे सांगितले आहे.
ट्विटर वापरकर्त्यांना भारतात त्याची सदस्यता सेवा घेण्याचा पर्याय अद्याप मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, वापरकर्ते ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे कसे देतील हा प्रश्न आहे. त्यामुळे एलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये पुष्टी केली आहे की, भारतात ट्विटर ब्लूचे रोलआउट एका महिन्यात होऊ शकते. ही सेवा सुरू झाल्यानंतर सबस्क्रिप्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
हे ही वाचा:
‘तर उद्धव ठाकरेंनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करावी’
‘उद्धव ठाकरेंनी केलेल्या बेईमानीचा बदला घेतला’
सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत
अँपल अँप स्टोअरमध्ये अँप अपडेट करून ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी आठ डॉलर आकारण्यास सुरुवातसुद्धा झाली आहे. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक मोठे बदल केले, व्हेरिफिकेशन टिक्ससाठी पैसे लागणार हे फीचर त्यातला एक महत्वाचा भाग आहे. याशिवाय, मस्क यांनी ट्विटर टीममधील सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.