नोएडा येथे उभारलेले बेकायदेशीर सुपरटेक ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त करण्यात आले आहे. ९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स काही सेकंदातच कोसळले आहे. इमारत जमीनदोस्त झाल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले. काही क्षणांसाठी तिथे काहीही दिसत नव्हते.
#WATCH | Once taller than Qutub Minar, Noida Supertech twin towers, reduced to rubble pic.twitter.com/vlTgt4D4a3
— ANI (@ANI) August 28, 2022
इमारत पडण्यावेळी त्या परिसरात सायरन वाजण्यास सुरुवात झाली आणि इमारत पडेपर्यंत तो सायरन वाजत होता. काही क्षणातच ट्वीन टॉवर जमीनदोस्त झाला. सगळीकडे धुळीचे लोट पसरले आणि आजूबाजूच्या इमारतींच्या परिसरात धुळीचे लोट पसरले. याची खबरदरी म्हणून आधीपासूनच इमारतींना पडदे लावलेले.
#WATCH | Cloud of dust engulfs the area after the demolition of #SupertechTwinTowers in Noida, UP pic.twitter.com/U9Q0mtwe3r
— ANI (@ANI) August 28, 2022
या इमारत पडण्यासाठी ९ हजार ६४० खड्डे तयार करण्यात आले होते. त्यात ३ हजार ७०० स्फोटकं पेरण्यात आली होती. एका बटणांत नऊ सेकंदात पत्त्यांच्या घराप्रमाणे हे टॉवर कोसळले. दुखापत आणि सुरक्षेसाठी आसपासच्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हे ही वाचा:
…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!
Twin Tower Demolition: नोएडामधले ट्वीन टॉवर कसे पाडणार? वाचा सविस्तर
पाकिस्तान ‘बुडाला’ आणीबाणी जाहीर
मुंबई नाही, तर इथे आहे एकनाथ शिंदेंचं मुख्य कार्यालय
दरम्यान, हे टॉवर उभे करायला तेव्हा ७० कोटी खर्च आला होता पण आता या इमारती पाडण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत होती. हे टॉवर्स पाडल्यानंतर ३० मीटर उंचीपर्यंत ढिगारा तयार होईल, अशी शक्यता केली होती. तर हा ढिगारा हटवण्यासाठी सुमारे तीन महिने लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.