मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल ) ने कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो-३ कॉरिडॉरच्या खोदकामात नवा टप्पा गाठला आहे.अशा प्रकारे ३२ किमी लांबीच्या भूमिगत कॉरिडॉरच्या बोगद्याचे १०० टक्के काम आता पूर्ण झाले आहे. या यशासह एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. संपूर्ण मार्गावर ५४ किमीच्या मेट्रो मार्गाचे बोगद्याचे कार्य पूर्ण झाले आहे.
एमएमआरसीएल द्वारे एकूण १७ टनेल बोर्डेरिंग मशीन (टीबीएम) वापरले गेले होते. टीबीएम ने बेसाल्ट, ब्रेसिया आणि टफने बनलेल्या खडकाळ स्तरातून अथकपणे ड्रिलिंग करून यश मिळवले आहे. बुधवारी, रॉबिन्सचे टीबीएम तानसा-१ याने ५५८ काँक्रीट रिंग वापरून महालक्ष्मी मेट्रो स्टेशन ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्टेशन पर्यंतची ड्राईव्ह पूर्ण केली. ही ड्राईव्ह ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक होती जी तानसा-१ टीबीएम ने २४३ दिवसांत पूर्ण केली. पॅकेज -३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. ही मेट्रो-३ कॉरिडॉरमधल्या सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक आहे.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु
उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?
साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार
एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “हे यश मेट्रो-३ कॉरिडॉरचे १०० टक्के बोगदे तयार झाले आहेत हे स्पष्ट करते. मुंबईच्या हेरिटेज परिसराच्या खाली, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याची मेट्रो लाईन, रेल्वे लाईन, वेगवेगळ्या भूवैज्ञानिक परिस्थिती असलेल्या जलकुंभाच्या सान्निध्यात बोगदा करणे हे एक कठीण काम होते. पण आता ते पूर्ण झाले आहे.” जमिनीच्या पातळीपासून २५-३० मीटर खोलीवर बोगद्याचे काम केले गेले. एकूण या प्रकल्पाची प्रगती ७६.६% आहे.