मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला !

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला !

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रात असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज सकाळी ८.३० वाजता भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २० जुलै रोजी रात्री हा तलाव भरला होता.

८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०२२ व वर्ष २०२१ मध्ये दिनांक १६ जुलै रोजीच ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०२० मध्‍ये दिनांक २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

हेही वाचा..

राहुल गांधी यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनावे

बांगलादेशात आरक्षण वाद पेटला, कर्फ्यू लागू, निदर्शनांमध्ये १०५ जण ठार !

धक्कादायक: हात-पाय बांधून जवानाला पत्नीकडून विषप्रयोग !

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ‘मविआ’ कार्यकर्त्यांकडे देऊ नका

महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती. जुलै महिन्यात अनेक दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पवई तलाव भरला होता. त्यानंतर आता तुळशी तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. जेणेकरून मुंबईतील पाणी कपात रद्द होईल.

Exit mobile version