पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून षडयंत्र रचल्याचा आरोप बावनकुळे केला आणि यासाठी मिडिया देखील मॅनेज केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच भाजपा या षडयंत्रचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे नालासोपारा वसई-विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकी पूर्व कसे काम करावे, मतदानाचा टक्का कसा वाढेल, बोगस मतदान कसे थांबवता येईल याकरिता बैठक घेत असताना विरोधकांनी षडयंत्र रचल. जाणीवपूर्वक पूर्वनियोजित कट रचला आणि त्यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला.
हे ही वाचा :
अणुऊर्जा समर्थीत देशाने रशियावर आक्रमण केला तर अण्वस्त्र हल्ला
वरळीतील लोकं ठाकरेंचे पैसे घेतील पण मतं देणार नाहीत
शशी थरूर म्हणतात भारताच्या राजधानीचे ठिकाण बदला
क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर यांच्याकडून आधी आरोप आणि नंतर तावडेंच्या गाडीचे सारथ्य
ते पुढे म्हणाले, विनोद तावडे हे मोठ्या प्रमाणात पैसा प्रमाणात पैसा घेवून आले असून वसई-विरार-नालासोपारामध्ये त्याचे वाटप करणार आहेत, असे सांगत विरोधकांनी हा सीन तयार केला. त्यासाठी मिडिया देखील मॅनेज केलं. राष्ट्रीय महासचिव पदी असलेला व्यक्ती असे पैसे वाटत सुटतील का?, याचाही विचार केला पाहिजे. खरे तर, पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. तपास यंत्रणानी या बाबतची दखल घेतली आहे. परंतु, भाजपा देखील या षडयंत्रचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.