सुलतानने राज नाव धारण करत हिंदू मुलीला फसवले!

सुलतान नामक तरुणावर गुन्हा दाखल

सुलतानने राज नाव धारण करत हिंदू मुलीला फसवले!

मध्य प्रदेशमधील सरांगपुर पोलिसांनी समाज माध्यमावर बनावट ओळख वापरून अल्पवयीन हिंदू मुलीला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलतान असे संशयिताचे नाव आहे. यातील मुलीला रिलेशनशिपमध्ये आणण्यासाठी सुलतानने इन्स्टाग्रामवर राज नावाने अकौंट काढले होते. ही घटना शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये घडली. सुलतान हा सारंगपूरच्या सिध्दखालचा रहिवासी आहे.

एका वृत्तानुसार त्याने समाज माध्यमावर राज नावाने आपली बाजू मांडत एका अल्पवयीन मुलीची दिशाभूल केली. राज नावाच्या खात्याच्या माध्यमातून त्याने या अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले. काही काळ तिच्याशी चॅट केल्यानंतर सुलतानाने तिची भेट घेतली. हिंदू संघटनांना त्यांची भेट आणि सुलतानचा दुर्भावनापूर्ण हेतू कळल्यानंतर त्यांनी या दोघांना पकडल्याने पुढील दुर्घटना टळली. यातील अल्पवयीन हिंदू मुलीला सुलतानची खरी ओळख कळल्यावर तिला धक्काच बसला. सरीकडे, सुलतानने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तरुणीलाही ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा..

महिनाभरात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने, चांदीचे दागिने अर्पण

पुढील तीन महिने ‘मन की बात’ ला सुट्टी

राष्ट्रध्वजाला म्हटले ‘सैतानी’; फ्रान्सने केले मुस्लिम धर्मगुरूला हद्दपार

अशोक चव्हाण कामाला लागले; तब्बल ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!

पोलिस ठाण्यात समुपदेशन करताना या मुलीने ओळख कशी झाली ते सांगितले. तिने सांगितलेल्या माहितीच्या आधारावर सुलतानवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ३६६ आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सारंगपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष बांगेला यांनी सांगितले की, संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version