पंतप्रधान मोदींकडून ‘द साबरमती रिपोर्ट’चे कौतुक, म्हणाले- ‘सत्य बाहेर येत आहे’

पंतप्रधानांकडून चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट

पंतप्रधान मोदींकडून ‘द साबरमती रिपोर्ट’चे कौतुक, म्हणाले- ‘सत्य बाहेर येत आहे’

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विक्रांत मॅसीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाबद्दल कौतुक करत पोस्ट केले आहे. ‘बनावट कथा काही काळ टिकतात, मात्र अखेर वस्तुस्थिती समोर येते,’ असे पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आलोक भट्ट नामक व्यक्तीने ट्वीटरवर पोस्ट केलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचा ट्रेलर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रीपोस्ट केला. रिपोस्ट करताना पीएम मोदींनी लिहिले की, सत्य बाहेर येत आहे आणि तेही सामान्य लोकांना दिसेल, ही चांगली गोष्ट आहे. बनावट कथा केवळ मर्यादित कालावधीसाठी टिकू शकतात. शेवटी, तथ्ये नेहमीच बाहेर येतात, असे पंतप्रधान मोदींनी लिहिले.

हे ही वाचा : 

केजरीवालांना धक्का, मंत्री कैलाश गेहलोतांचा पदाचा राजीनामा, पक्षही सोडला

मोदी म्हणाले म्हणून, १२ वर्षानंतर राहुल गांधींची बाळासाहेबांना आदरांजली!

पत्रकार हे मालकांचे गुलाम, राहुल गांधी यांनी पत्रकारांना दाखवली जागा

सायबर क्राईम टोळीचा पर्दाफाश

दरम्यान, अभिनेता विक्रांत मॅसीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २००२  रोजी घडलेल्या गोध्रा ट्रेन दुर्घटनेवर आधारित आहे. अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या कारसेवकांच्या बोगीला आग लावण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेत ५९ कारसेवकांचा जीव गेला होता. याच्या एका दिवसानंतर, २८ फेब्रुवारीपासून गुजरातमध्ये भीषण जातीय दंगली घडल्या, ज्यात सुमारे १००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

Exit mobile version