खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा संबंध भारताशी असल्याचा आरोप जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. यावर कॅनडाच्या विरोधी पक्षाचे सदस्य पियरे पॉइलीव्हरे म्हणाले की, निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला परंतु याबाबत अधिक सत्य सांगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जूनमध्ये झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारचा संभाव्य संबंध असल्याचा दावा केल्यानंतर कॅनडाने सोमवारी एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.त्यानंतर काही तासांतच भारताने मंगळवारी कॅनडाच्या सर्वोच्च मुत्सद्दी ऑलिव्हियर सिल्वेस्टरची हकालपट्टी केली होती.
हे ही वाचा:
गणपतीला जाणाऱ्या गाडीला समृद्धीवर अपघात, १ मृत्युमुखी
नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !
इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !
अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !
यानंतर आता कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते, पियरे पॉइलीव्हरे यांनी आपले मत नोंदवले आहे, ते म्हणाले, जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या आरोपावर अधिक सत्य सांगावे , आम्हाला या संबंधित संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे जेणेकरून कॅनेडियन त्यावर निर्णय घेऊ शकतील,असे ते म्हणाले.बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.पंतप्रधानांनी आतापर्यंत कोणतीही ठोस माहिती दिली नाही, जी माहिती सार्वजनिकपणे कॅनेडियन लोकांना दिली त्यापेक्षा अधिक माहिती आम्हाला खाजगी स्वरूपात देण्याची गरज होती. मात्र, ती त्यांनी दिली नसल्याने आम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्याचे, पॉलीव्हरे यांनी सांगितले.
तथापि, कॅनडाने केलेल्या आरोपाला भारत सरकारने फेटाळून लावले आणि कॅनडानं केलेला हत्येचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं भारतानं म्हटलं आहे..परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा आणि प्रेरित आहे.”