दोन बांगलादेशी नागरिकांना आगरतळा रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे.कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतीय हद्दीत प्रवेश केल्याबद्दल दोघांना पकडण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी(२२ मे) दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे.भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.आगरतळा रेल्वे स्थानकावर या दोघांना ताब्यात घेण्यात आले.नर्गिस अख्तर (३५) आणि मेहेदी हसन (३५) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.हे दोघेही बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
हे ही वाचा:
‘भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत, उर्वरित दोन टप्प्यांत ४०० ओलांडणार’
पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?
भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!
संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांविरुद्ध आगरतळा रेल्वे स्थानकावर असलेल्या शासकीय रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम-१२० (बी), ३७०, परदेशी कायदा १९४६ चे कलम (ए)/१४ (सी) आणि सेक्शन तीन आयपीपी कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.