त्रिपुरातील आगरतळा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध घुसखोरांना पकडले आहे. यावेळी घुसखोरांची संख्या २८ होती, ज्यामध्ये २ रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशींना मदत करणारा दलालाचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगरतळा स्थानकावरून शनिवारी (२७ जुलै) रात्री विविध शहरांमध्ये जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याच्या तयारीत असलेल्या २८ घुसखोरांना रेल्वे पोलिसांनी पकडले, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम व्यवसायासाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे घुसखोरी करत आहेत. गेल्या काही महिन्यांत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत.
हेही वाचा..
पॅरिस ऑलिम्पिक : डिझायनर तहलीयानी म्हणाले, खेळाडूंची गणवेशनिर्मिती विचारपूर्वकच !
ऑलिम्पिक २०२४; नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला कांस्यपदक जिंकण्याची संधी !
केजरीवालांविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र
अनिल देशमुखांनी समित कदमचे फडणवीसांसह फोटो दाखवले, आदित्य ठाकरेंचेही फोटो मिळाले
लोकांच्या म्हणण्यानुसार, अशा घुसखोरीमुळे, आसाम, झारखंड, पश्चिम बंगाल सारख्या भारतातील काही राज्यांच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने बदल होत आहे. दुसरीकडे, भारतात कार्यरत असलेल्या काही मुस्लिम संघटना आणि दलाल या घुसखोरांना नोकऱ्या, उद्योग आणि छोटा-मोठा व्यवसायसह बेकायदेशीर अवैद्य कागदपत्रे देण्यात गुंतले आहेत.
दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांत, GRP, BSF आणि त्रिपुरा पोलिसांनी १५० हून अधिक बांगलादेशी नागरिक आणि ३२ रोहिंग्यांना आगरतळा रेल्वे स्टेशन आणि त्रिपुरातील इतर अनेक ठिकाणांहून अवैधरित्या भारतात प्रवेश केल्यानंतर अटक केली आहे.